पत्रकार संतलाल यादव यांच्यावर झालेल्या हल्याचा निषेध तसेच कारवाईची मागणी पिंपरी -चिंचवड पत्रकार संघ

पिंपरी: दीपक श्रीवास्तव, प्रतिनिधि (वास्तव चक्र न्यूज़ ) पिंपरी चिचवड -बुधवार दि २५ डीसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता च्या दरम्यान सिद्धांत समाचार या दैनिक वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक तसेच रफ्तार बुलेटिनचे मुख्यसंपादक संतलाल यादव यांच्यावर गुडांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.

सदरील घटनेच्या निषेधार्थ तसेच कारवाईची मागणी करीत श्रमिक,तसेच पिंपरी -चिंचवड पत्रकार संघ यांच्या वतीने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हेगारांना कडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली गेली.

कारण जोपर्ययंत कडक कार्यवाही होत नाही तोपर्यंत लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जाणार्या पत्रकाराला खरा ज्ञाय मिळणार नाही,शिवाय ख-या गुन्हेगारी प्रवृत्तीला लगाम लागणार नाही .पत्रकार म्हणजे समाजात सर्प्रकारच्या माहीती समाजासमोर मांडणारा दर्पण ्त्यामुळेसर्वच स्थरातुन त्यांचा सन्मान राखला जावा,त्यांचे संरक्षण व्हावे त्यातुन त्यांच्या उदर निर्वाहाची सोय व्हावी ही काळाची गरज.शिवाय पत्रकारांनाही मानमर्यादेची बंधनेअसतातच त्याला विसरुनही चालणार नाही..

याप्रकरणी आरोपी महेश नढे, किरण नढे व त्यांचे वडील , नवनाथ नढेसह त्यांचे सहा ते सात(सर्व राहणार, काळेवाडी पिंपरी चिंचवड) साथीदारांवर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतलाल यादव यांच्यावर केलेल्या हल्ल्यामध्ये त्यांची दोन्ही मुले जखमी झाली आहेत. घटनेचा अधिक तपास वाकड पोलिस करीत आहेत.