भारतीय जैन संघटना प्राथमिक विद्यालयात ‘महाराष्ट्र माझा’ प्रदर्शन उत्साहात संपन्न

पिंपरी: (वास्तव चक्र न्यूज़ ) मंगळवार, दि.७जानेवारी २०२०* रोजी *भारतीय जैन संघटना प्राथमिक विद्यालयात *बजाज एज्युकेशन इनिशिएटिव्ह* यांचे मार्गदर्शनाखाली *महाराष्ट्र माझा* या शैक्षणिक प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील सर्व विद्यार्थी,पालक व शिक्षकांचा यात सहभागी होता. प्रदर्शनाचे उदघाटन *बजाजच्या प्रकल्प अधिकारी शेफाली मोहिते, समन्वयक अनघा दिवाकर, दत्तात्रय कुमठेकर व नगरसेविका सुजताताई पालांडे* यांच्या शुभहस्ते झाले. पपेट शो द्वारे पृथ्वी पासून महाराष्ट्राकडे जात प्रदर्शनाला सुरुवात झाली. प्रदर्शनात *महाराष्ट्राचे स्थान, प्राकृतिक व प्रशासकीय विभाग, महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ, महाराष्ट्रातील नद्या, धरणे, शेती, उद्योगधंदे, पर्यटन स्थळे, खनिज संपत्ती, महाराष्ट्रातील साहित्यिक, समाजसुधारक, कर्तृत्ववान स्त्रिया, संशोधक, खेळाडू, संत महाराष्ट्रातील सण-उत्सव, प्रसिद्ध फळे, महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, महाराष्ट्राचा इतिहास, शिवकालीन हत्यारे, किल्ला व धरणाची प्रतिकृती , विविध हस्तलिखिते, सर्वेक्षण, व्यावसायिकांच्या मुलाखती,तसेच महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती व लोकनृत्ये* इत्यादीचे सादरीकरण करण्यात आले होते. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय जाधव, माध्यमिक विभागाचे प्र.प्राचार्य श्रीकांत कदम, उपमुख्याध्यापक डॉ. राजेंद्र कोकणे, पर्यवेक्षक पांडुरंग पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. *महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती मध्ये मांडलेल्या पुरणपोळी, मासवडी, वांग्याचं भरीत, श्रीखंड पुरी, अळूवाडी, कोथिंबीर वडी, धपाटे कोकणातील अंबोळी, घावन, नारळीभात, उकडीचे मोदक* यामुळे उपस्थितांच्या तोंडाला पाणी सुटले होते. *महाराष्ट्रातील लोकनृत्यांमध्ये भूपाळी पासून भारुड,लावणी* पर्यंतच्या सर्व कलाप्रकारांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. परीसरातील नागरीक, इतर शाळांतील विद्यार्थी, शिक्षक यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. सदर प्रदर्शनात बालवाडी ते ४थी चे विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक संजय जाधव, शैला बर्वे, दीपिका सावंत, अरुण धिवार, स्नेहलता वाडेकर, प्रदीप बोरसे, विलास गुंजाळ, अपर्णा कुमठेकर, भाग्यश्री भोईर, सुवर्णा जाधव, सायली माने, सविता अमोलिक, ज्योती साखरे, जागृती राऊत , वैशाली कांबळे यांनी परिश्रम घेतले.