महाराष्ट्रातील ‘माईल स्टोन’ इंद्रायणी थडीमध्ये भरगच्च ‘इव्हेंट’

आमदार महेश लांडगे यांचा मनोरंजनासह प्रबोधनावर भर
– शिवांजली सखी मंचच्या सदस्यांकडून जत्रेची जोरदार तयारी

पिंपरी । प्रतिनिधी (वास्तव चक्र)

महिला सक्षमीकरण चळवळीतील सार्वजनिक उपक्रमात ‘माईल स्टोन’ ठरलेल्या ‘इंद्रायणी थडी’ जत्रेत भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. मनोरंजन, खेळ आणि प्रबोधनासह महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ निर्माण करणारी ही जत्रा ‘रेकॉर्ड ब्रेक’ ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवडचे भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा ‘इंद्रायणी थडी’ भरविण्यात येणार आहे.

दि. ३०, ३१ जानेवारी आणि १, २ फेब्रवारी २०२० असे चार दिवस, सकाळी १० ते सायंकाळी १० या वेळेत ही जत्रा नागरिकांसाठी खुली राहणार आहे. ‘महिला सुरक्षा आणि सन्मान’ ही जत्रेची थीम आहे. यासह मनोरंजन, खेळ, ऐतिहासिक पौराणिक देखावे, खाद्यपदार्थ, महिला बचतगाटांची उत्पादने, महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा याची प्रचिती देणारी इंद्रायणी थडी यावर्षी दुसरे पर्व साजरे करीत आहे, अशी माहिती शिवांजली सखी मंचच्या प्रमुख पुजा महेश लांडगे यांनी दिली.

जत्रेमध्ये आयोजित करण्यात येणारे प्रमुख कार्यक्रमांचे स्वरुप पुढीलप्रमाणे :

दिवस पहिला (गुरुवार, दि.३० जानेवारी २०२०) : उद्घाटन समारंभ, चला हवा येवू द्या, संगीत कार्यक्रम : ज्ञानेश्वर मेश्राम, भजन स्पर्धा, पारंपरिक नृत्य स्पर्धेची निवड चाचणी असे कार्यक्रम होतील.

दिवस दुसरा (शुक्रवार, दि.३१ जानेवारी २०२०) : भजन स्पर्धा, नव्याने जत्रा भरते : सुधीर काळजे, पारंपरिक नृत्य स्पर्धेची अंतिम फेरी.

दिवस तिसरा (१ फेब्रुवारी २०२०) : अभंग बँड, पारंपरिक फॅशन शो, कीर्तन : निवृत्ती महाराज देशमुख, पाश्चात्य नृत्य स्पर्धा निवड चाचणी आणि अंतिम फेरी, स्व-संरक्षण कार्यक्रम.

दिवस चौथा (२ फेब्रुवारी २०२०) : पारंपरिक फॅशन शो, भजन स्पर्धा, ‘मिस इंद्रायणी’ फॅशन शो, डान्स स्पर्धा, मर्दानी खेळ, आदीवासी नृत्य, जत्रेचा समारोप कार्यक्रम.

****

जत्रेतील आकर्षक छोटे कार्यक्रम पुढीलप्रमाणे :

मॅजिक शो, वन मिनिट शो, मंगळागौर उखाणा कार्यक्रम, मॅजिक शो-धनगर, झुंबा डान्स, कोळी डान्स, लावणी कार्यक्रम, मर्दानी खेळ, आदिवासी नृत्य, ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन, गड-किल्ले छायाचित्र प्रदर्शन, बालजत्रा आदी.

          ***

इंद्रायणी थडीतील लक्षवेधी काय?

–      राम मंदिर प्रतिकृती

–      महात्मा फुले वाडा

–      ग्राम संस्कृती

–      बालजत्रा

–      खाद्यपदार्थ महोत्सव

–      लेझर शो