शिव जयंती निमित्त गगन भरारी महिला संस्था यांच्याकडून महिलांच्या टू व्हीलर रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले

पिंपरी- ( प्रतिनिधी- दिपक श्रीवास्तव ) भोसरी लांडेवाडी, 19 फेब्रुवारी 2020 , शिव जयंती निमित्त गगन भरारी महिला संस्थेच्या संस्थापकीय अध्यक्ष सौ मेघा हणमंत पवार यांच्याकडून महिलांच्या टू व्हीलर रॅली च आयोजन करण्यात आले , गगन भरारी महिला विकास संस्था महिलांच्या सक्षमीकरण आणी सशक्ती कारणाच्या दृष्टीने नेहमी प्रयत्न शील असते , नवीन बचतगट तयार करणे , बचतगटांचे संघटन करणे , समजतील वंचित महिलांसाठी मोफत प्रशिक्षण वर्ग चालवणे , नैसर्गिक आपत्ती मधे मदत करणे , महिलांसाठी मोफत व्यावसायिक कार्यशाळा घेणे , मासिक पाळी आणी महिला व मुलींच्या सुरक्षे च्या दृष्टीने जनजागृती करण्याचे काम करत आहॆ . या वर्षी शिवजयंती च्या माध्यमातून एक शिवसंदेश समाजात द्यावा या दृष्टीने रॅली चे नियोजन केले , लांडेवाडी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून शिवसंदेशाचे 1000 पत्रक लोकांमध्ये वाटण्यात आले . या शिवसंदेशामध्ये आज वाढत असलेल्या महिला व मुलींविषयी च्या चुकीच्या घटना आणी मुलांची बदलत चाललेली मानसिक वृत्ती या विषयी आता पालकांनी ,महिलांनी जागृत व्हावं तसेच ,शिवजयंती पुरते महिलांचा सन्मान करण्यापेक्षा शिवाजी महाराजांचे विचार कायम मनात रुजवावे व महिलांना सन्मानाने जगु द्यावं हा संदेश समाजात देण्याचा एक छोटासा प्रयत्न आमची संस्था करत आहॆ … आजच्या या शिवजयंती साठी महिलांनी हि चांगला प्रतिसाद दिला . , सौ ऋतुजा खोतकर , सौ धनश्री भामरे ,सौ उषा पवार , कु .पूजा चंडालीया ,सौ मनीषा मलखंडे या संस्थेच्या पदाधिकारी महिला तसेच इतर सभासद महिला उपस्थित होत्या अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष सौ मेघा पवार यांनी दिली ..