आम आदमी पार्टी 2022 महापालिका निवडणूक लढवणार आहे. पालिकेत असलेल्या 32 प्रभागातील सर्वांच्या सर्व 128 नगरसेवक सीट आप लढवणार

पिंपरी :- ( प्र.दिपक श्रीवास्तव ) आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर तर्फ
आज पत्रकार परिषदेत घेण्यात आली. यावेळी आप चे पुणे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत, पुणे शहर संघटन मंत्री Dr अभिजित मोरे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अनुप शर्मा ,अल्पसंख्याक अध्यक्ष पुणे जिल्हा वहाब शेख उपस्थितीत होते.

या वेळी उपस्थित केलेले विषय.

पिंपरी चिंचवड 2022 निवडणूक
आप 2022 ची महापालिका निवडणूक लढवणार आहे.
पालिकेत असलेल्या 32 प्रभागातील सर्वांच्या सर्व 128 नगरसेवक सीट आप लढवणार आहे. त्यासाठी शहरातील सर्व सेवाभावी व सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना आव्हान आहे की आपण आप सोबत यावे. प्रस्थापित पक्षांची भ्रष्ट व्यवस्था जनतेला नकोशी झाली आहे व ती बदलण्याचा आप प्रयत्न करेल.

नवीन कार्यकारिणी ची घोषणा

आप पिंपरी चिंचवड ची नवीन कार्यकारणी नियुक्त करण्यात येत आहे ती पुढील प्रमाणे असेल
अध्यक्ष – अनुप शर्मा
सचिव – राघवेंद्र राव
कोषाध्यक्ष – सुशील अजमेरा
उपाध्यक्ष – महेश बिराजदार, संदीप देवरे, प्रज्ञेश शितोळे
प्रवक्ता – कपिल मोरे
अल्पसंख्य विंग – यशवंत कांबळे
सदस्य – सुजय शेठ, चेतन बेंद्रे, राज चकने, अरविंद देवगडे, उमेश साठे, वहाब शेख

पक्ष वाढीचे आव्हान, सदस्यता मोहीम
पक्ष 23 feb ते 23मार्च एक महिना सदस्यता मोहीम राबवत आहे. त्याला भरपूर चांगला प्रतिसाद मिळत आहे. लवकरच पक्षाची महिला विंग ची घोषणा करू. पक्षात स्मिता पवार यल यांनी प्रवेश नुकताच केला आहे . त्यांचा सारख्या तडफदार व संसजसेवी महिला आमच्या महिला विंग सांभाळतील.

IT Wing ची स्थापना
तसेच शहरात अनेक IT क्षेत्रातील कर्मचारी आहेत व त्यांचे ही अनेक प्रश्न आहेत. तरी आज पर्यंत एकाही पक्षाला IT wing काढावी असे वाटले नाही. आम आदमी पक्षाने जेव्हा यावर माहिती घेतली तेव्हा IT क्षेत्रातील लोकांचे अनेक समस्या लक्षात आले. आप IT विंग यावर काम करेल. त्याची जबाबदारी राघवेंद्र राव वर असेल. IT विंग प्रामुख्याने खलील विषयवार काम करेल
1. Forced Resignations
2. Creches for Employees kids in office
3. Harrasments
4. Layoffs
5. Cable lobby in pcmc

स्वराज्य मॉडेल ने राजकारण
आप पिंपरी चिंचवड मध्ये आपचे स्वराज्य मॉडेल समोर ठेवून काम करेल. त्या अंतर्गत शहरातील 32 वॉर्ड मधील सर्व छोट्या मोठ्या प्रश्नांची यादी लोकांना विचारून बनवण्यात येईल व ती त्या वॉर्डच्या प्रत्येक नगरसेवकाला तारीख टाकून पाठवण्यात येईल. त्याच बरोबर प्रभागतल्या सगळ्या राहिवासीयांना कळवण्यात येईल व ऑनलाईन टाकण्यात येईल… दर महिन्याला त्याची आठवण करून देण्यात येईल…तारीख टाकल्यामुळे छोटे प्रश्न सोडवायला नगरसेवक किती दिवस घेतात हे लोकांना कळेल …तसेच लोकांचे खरे प्रश्न काय आहेत त्यावर राजकारण होईल..नाहीतर लोकांचे प्रश्न वेगळे असतात व नगरसेवक काम वेगळे करतात….

प्राधिकरण चे amenities चे plot
प्राधिकरण ने गार्डन, मैदान, बस आगार , amenities साठी राखीव असलेले प्लॉट त्वरित महापालिकेला ताब्यात द्यावे…प्राधिकरण सर्व commercial प्लॉटस लगेच विकसित करते , पण गार्डन, मैदान, amenities चे प्लॉट मात्र अनेक वर्षे विकसित करत नाही , handover करत नाही..उदाहरणार्थ sector 11 spine रोड चे गार्डन, मैदान व बस आगार चे आरक्षण 10 वर्षांपासून आहे..आजू बाजूचे रोड , रहिवासी प्लॉटस विकसित झाले तर एका दशकात साधे पालिका ट्रान्सफर झाले नाही ? ते “changeof use ” ची वाट पाहत आहेत का ? कुणाला चरायचे आहे त्या वर ?


प्रॉपर्टी टॅक्स
जुन्या मालमत्तेचे प्रॉपर्टी टॅक्स एकदम दुपटीने वाढवणे म्हणजे जनतेवर अचानक मोठा डल्ला आहे..त्या ऐवजी दरवर्षी थोडं अशी भूमिका घ्यावी…तसेच ज्या भगत आहात नाही काहीच विकसित करण्यात येणार नाही,कुठलाच मोठा प्रकल्प होणार नाही आहे त्या भागातल्या मालमत्तेवर वाढीव कर नसावा…

पाणी व करवाढ
पाणी करवाढ करण्याचा महापालिकेला काहीच अधिकार नाही, जर महापालिका 40% पाणी चोरी पकडू शकत नसेल तर. तसेच ही चोरी महापालिकेच्या free टँकर च्या सुविधेतूनच होत आहेत अशी शंका आहे….त्यामुळे मोफत टँकर योजनेचे ऑडिट व्हायला हवे…एकंदरीत संपुर्ण शहराचे पाण्याचे audit करून श्वेतपत्रिका काढावी म्हणजे पितळ पिवळे पढेल…तसेच हौसिंग फेडरेशन pil करण्यासाठी कोर्टात जाणार होती तेव्हा त्यांच्यावर राजकीय दबाव आला म्हणे. ही कोणती राजकीय शक्ती आहे हे लोकांना कळावे..