ताजा खबरे

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना व्हायरस चे वातावरण ,कलम 144,188 ची कारवाही होणार

प्रतिनिधी: दिपक श्रीवास्तव,9067865094,9373118087 पिंपरी:- नागरिकांनी उपरोक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड सहिता कलम 188 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 याद्वारे आवश्यक ती कारवाई करण्यात येईल याची सूचना देण्यात आली आहे. उपरोक्त आठ पथकात अतिक्रमण विभागाचे प्रत्येकी एक अधिकारी एक वाहन चालक तीन पोलिस कर्मचारी तीन होमगार्ड आठ मजूर तसेच पोलीस विभागाकडील एक पोलीस उपनिरीक्षक इत्यादी आहेत.
आज दिनांक २०/०३/२०२० रोजी या पथकामार्फत पिंपळे गुरव, सांगवी कृष्णा चौक सृष्टी चौक फेमस चौक पिंपळे सौदागर वाकड भोसरी चिखली मोशी बोराडेवाडी इंद्रायणी नगर आकुर्डी निगडी दिघी दापोडी साने चौक यमुनानगर इत्यादी परिसरात जाहीर आवाहन करण्यात आले आहे. सदर मोहीम पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे मा.आयुक्त, मा. अतिरिक्त आयुक्त (२), मा.शहर अभियंता तसेच पोलीस विभागाचे पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सदर मोहीम दि.२०/०३/२०२० ते ३१/०३/२०२० या कालावधीत सुरू असणार आहे.

सध्यास्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना व्हायरस चे वातावरण आहे. सदर विषाणूंची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस अथवा इसमास त्यांच्या संपर्कात आल्याने होते. त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी पुणे यांनी कलम 144 अन्वये जमावबंदी लागू केलेली आहे. तरी खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व प्रकारचे समारंभ सांस्कृतिक, धार्मिक सण, उत्सव, जत्रा, मनोरंजन, कार्यक्रम, क्रीडा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलन, सहली, शॉपिंग, कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमा ग्रह, शाळा-महाविद्यालय, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायाम शाळा, संग्रहालय, व्हिडिओ पार्लर, ऑनलाईन लॉटरी सेंटर, पानटपरी, सर्व परमिट रूम, बियर बार, तसेच अत्यावश्यक विषया खेरीज, इतर शासकीय बैठकांस दिनांक ३१/०३/२०२० पर्यंत मनाई राहील. उपरोक्त बाबीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम / अतिक्रमण निर्मूलन व नियंत्रण विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्यासमवेत आठ पथक निर्माण करून उपरोक्त सूचनेनुसार पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना उपरोक्त बाबी बंद ठेवण्याचे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.