सावधान :येथे पञकारांना पेट्रोल मिळणार नाही ;जयहिंद पेट्रोल पंप येथे पञकारांनाच पेट्रोल मिळत नाही

सावधान :येथे पञकारांना पेट्रोल मिळणार नाही ;जयहिंद पेट्रोल पंप येथे पञकारांनाच पेट्रोल मिळत नाही

पिंपरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात पेट्रोल-डिझेल विक्रीसही बंदी करण्यात आली आहे. नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पेट्रोल-डिझेलच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

या बंदी अंतर्गत खाजगी दुचाकी, चारचाकी, तीनचाकी वाहनांना पेट्रोल भरण्यास मनाई करण्यात आली आहे. तर, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना यातून सूट देण्यात आली आहे.



अत्यावश्यक सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, कोरोना नियंत्रण, पञकार आणि निर्मूलन करणाऱ्या खासगी व्यक्ती, अत्यावश्यक वस्तू आणि सेवा संदर्भात कार्य करणाऱ्या खासगी व्यक्ती, वैद्यकीय उपचार किंवा सहाय्याची गरज असणाऱ्या व्यक्तींना यामध्ये सूट देण्यात आली आहे. मात्र,पिंपरी-चिंचवड येथील जयहिंद पेट्रोल पंप येथे पञकारांनाच पेट्रोल देण्यात येत नाही बाकी सर्व ठीकाणी पञकारांना पेट्रोल मिळते पण याच जागी हे जयहिंद पेट्रोल पंप वाले मनमानी का करत आहेत. याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.