ताजा खबरे

बांधकाम व्यावसायिक अनिलशेठ आसवानी यांच्याकडून गरीब कुटुंबांना मदतीचा हात

प्रतिनिधी:- दिपक श्रीवास्तव ( वास्तव चक्र न्यूज़ )
पिंपरी (22 एप्रिल 2020) : कोरोना या जागतिक महामारीचा सामाना करण्यासाठी देशभर 25 मार्च 2020 पासून 3 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था प्रयत्न करीत आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून प्राणपणाने या संकटाचा मुकाबला करीत आहेत. या लॉकडाऊनमुळे गोरगरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ लागली आहे.

स्थानिक पातळीवर अनेक सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रातील संस्था संघटना स्वत:हून गोरगरीबांना मदत करीत आहेत. अशीच माणुसकीच्या भावनेतून पिंपरीतील बांधकाम व्यावसायिक अनिलशेठ आसवानी आणि त्यांच्या काही निवडक मित्रांनी मागील चार दिवसांपासून पिंपरी कॅम्पमधील संजयगांधीनगर, गणेशनगर, डेअरी फार्म, डिलक्स थिएटरमागील वसाहत, पत्राशेड, वैष्णव माता मंदिराजवळील वसाहत या भागातील गोरगरीब गरजू नागरिकांना एक महिना पुरेल एवढे किराणा सामान यामध्ये पीठ, तांदूळ, तीन प्रकारच्या डाळी, तेल, मीठ असे किराणाचे किट सुमारे बाराशे कुटुंबांना वाटप करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात यापुर्वी पडलेल्या दुष्काळात ग्रामीण भागातील चारा छावण्यांना त्यांनी मोठी आर्थिक मदत केली होती. तसेच मागील वर्षी कोल्हापूर, सातारा, सांगली परिसरात आलेल्या महापुरातदेखील उद्योजक अनिल आसवानी व त्यांच्या मित्रांनी त्या परिसरात जाऊन प्रत्यक्ष मदत कार्य केले होते. मागील चार दिवसांपासून पिंपरी कॅम्प व परिसरातील सुमारे बाराशे कुटुंबांना त्यांनी हे किराणा किट दिले आहे. आणखी देखील गरजू कुटुंबांनी अनिल आसवानी (9921501501) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या मदत कार्यात अनिल आसवानी यांच्यासोबत महेश नागराणी, रमेश चुघ, प्रकाश समतानी, जगदीश आसवानी, ईश्वर राजानी, दिनेश तलरेजा, पवन रामनानी, दिलीप पंजवानी, श्रीचंद मनधन, अनिल तांबे, गणेश गोविंदन, विनोद साधू, रमेश कुकरेजा, बाबू वासवानी, तुलसी सोनेजी, निरज हसीजा, सुरेश खाखरानी, गोपाल मूलचंदानी, राजा सिंदनानी, विनीश धरमानी, दौलत खटवानी, संजय नागदेव आदी सहभागी झाले.