ताजा खबरे

फुगेवाडीमधील राधिका रेसिडेन्सी प्रवेशव्दारावर सॅनिटाईज यंत्रणा राधिका मित्र मंडळाचा उपक्रम

प्रतिनिधी:- दिपक श्रीवास्तव ( वास्तव चक्र न्यूज़) 9067865094—–
पिंपरी (18 एप्रिल 2020) : जगभर कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. भारतातील सर्व प्रशासकीय यंत्रणा या महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वतोपरी
प्रयत्न करीत आहेत. यामध्ये सर्व नागरिकांनीदेखील सोशल डिस्टन्स, वारंवार हात धुणे, हाताला सॅनिटायझर लावणे अशी दक्षता बाळगूण स्वत:चे संरक्षण करावे,
असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी येथील राधिका रेसिडेन्सी या गृहनिर्माण सोसायटीतील


नागरिकांनी एकत्र येऊन सोसायटीच्या प्रवेशव्दारासमोर सोसायटीत येणा-या जाणा-या सर्व नागरिकांना सॅनिटाईज करता यावे यासाठी आधुनिक यंत्रणा उभारली आहे.
राधिका मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके तसेच अनिल शर्मा, जयंत करीया, कैलास धुमाळ, राजेश देसलडा, सुनील बेलवलकर, शिरीष जोशी, प्रकाश दसानी,
जयकर शेट्टी, जगदीश यादव, महेंद्र गादिया, संदीप अगरवाल आदींनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. तसेच राधिका मित्रमंळाच्या वतीने मागील 18
दिवसांपासून पुणे-मुंबई महामार्गावर अत्यावश्यक सेवेतील कार्यरत असणा-या पोलिसांना पाण्याची बाटली व सॅनिटायझर आणि गरजू नागरिकांना 15 दिवसाचे किराणा
धान्य देण्यात आले. राधिका सोसायटीत घरकामास येणा-या महिला व स्वच्छता कर्मचारी आणि सुरक्षारक्षक आदींना एक महिन्याचा किराणा माल 45 लोकांना
राधिका मित्रमंडळाच्या वतीने मोफत देण्यात आला. अशाप्रकारची सॅनिटाइज यंत्रणा इतर गृहनिर्माण सोसायट्यांनी उभारावी व अत्यावश्यक असेलच तरच घराबाहेर
सोशल डिस्टन्स ठेवून रहावे. इतरांनी घरीच राहून या विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करावा, पोलिस व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष
बाळासाहेब साळुंके यांनी केले आहे.