ताजा खबरे

पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करून लुटणार्‍या तीन आरोपींना मुद्देमालासह 12 तासात गुन्हे शाखा युनिट 3 व वाहनचोरी विरोधी पथकाकडून अटक

पिंपरी:- ( वास्तव चक्र न्यूज़ ) दिनांक 21/ 4/ 2020 .रोजी रात्री साडेआठ वाजता सुमारास चाकण पोलीस ठाणे कडील नेमणुकीस असणारे पोलीस नाईक बॅच नंबर 995 इंदर कुमार तुकाराम धोत्रे हे सरकारी गणवेश यामध्ये ड्युटी करिता आळंदी घाट मार्गे मोटार सायकल वरून चाकण येथे जात असताना मौजेचा तालुका खेड जिल्हा पुणे गावाच्या हद्दीत आले असता अनोळखी तीन इसमांनी त्यांना डोक्यात मारून खाली पाडून नंतर लाकडी दांडक यांनी व लाथांनी मारहाण करून जबर दुखापत केली तसेच त्यांच्याकडील मोबाइल व रोख रक्कम एटीएम कार्ड तसेच क्रेडिट कार्ड असा एकूण नऊ हजार रुपयांचे किमतींचा जबरी चोरी करून चोरून नेला होता सदर बाबत चाकण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला

सदर गुन्हा घडल्यानंतर सदरची बाब गंभीर असल्याने माननीय पोलिस आयुक्त श्री संदीप विशनोई यांनी तपासाबाबत सूचना दिल्यात त्याप्रमाणे माननीय स.पोलीस आयुक्त सो .गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तीन तपास पथके तयार केली व त्यांचे बातमीदारांना अवगत केले तसेच तांत्रिक विश्लेषणाची मदत घेऊन तपास करीत असताना पोलीस नाईक यांना बातमीदार कडून बातमी मिळाली की संशयित तीन इसम हे त्यांच्याकडील चोरीचा मोबाईल विक्रीकरिता ग्राहकांचा शोध घेत असून ते सध्या चाकण या ठिकाणी एका मोटर सायकल वरून ट्रिपल सीट फिरत आहेत

याप्रकरणी तीन आरोपींना मुददेमालासह 12 तासात गुन्हे शाखा युनिट तीन आणि वाहन चोरी विरोधी पथकाडून अटक केली. ही घटना चाकण जवळील रासे गावच्या हद्दीत घडली होती.अश्विन अरुण रोकडे (वय 27), शाहरुख इजाजखॉं पठाण (वय 22), प्रतिक योगीराज खडसे (वय 21, तिघेही रा. अरुण कुसाळकर यांचे प्लॅटमध्ये, शिक्रापुर रोड, चाकण, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

या गुन्ह्याच्या शोधाकरिता तीन तपास पथके तयार केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे यांना बातमीदाराकडून आरोपींबाबत माहिती मिळाली की चाकणमध्ये एका दुचाकीवरून तिघेजण मोबाईल विक्रीसाठी फिरत आहेत. त्यानुसार शिक्रापुर रोडवर संशयित आरोपींना हटकताच ते पळून जावू लागले. पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपींकडून गुन्हयातील फिर्यादी यांचा मोबाईल फोन व गुन्हयात वापरलेली बजाज डिस्कव्हर मोटर सायकल असा एकुण 30 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.पोलीस आयुक्त संदीप विष्णोई, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्‍त (गुन्हे) सुधिर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त (गुन्हे) आर. आर. पाटील, श्रीधर जाधव, वरिष्ठ निरीक्षक सुधिर अस्पत, शंकर बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरिक्षक सतिश कांबळे, उपनिरिक्षक गिरिष चामले, कर्मचारी विजू कांबळे, पठाण, सानप, चव्हाण, विवेकानंद सपकाळे, नितिन पराळे, यदु आढारी, नाथक केकान, योगेश कोळेकर, सचिन मोरे, त्रिनयन बाळसराफ, सागर जैनक, राज हनमंते, प्रमोद ढाकणे, मेहश भालचिम, शशिकांत नांगरे, अरुण साबळे, अमोल साकोरे, सचिन उगले, तांत्रिक विश्‍लेषक हवालदार नागेश माळी, राजेद्र शेटे यांनी केली आहे.