इंद्रायणीनगर भागात नगरसेविका नम्रता लोंढे यांचा कष्टक-यांना मदतीचा हात

संपादक -दिपक श्रीवास्तव 9373118087/9067865094
पिंपरी (26 एप्रिल 2020) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे 2020 पर्यंत देशभर लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे देशभरातील उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्याचा परिणाम पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत देखील तीव्रतेने जाणवत आहे. शहरामध्ये व एमआयडीसीमध्ये रोजंदारीवर काम करणा-या कष्टकरी कामगारांचे हाल होत आहेत. अनेक कुटुंबांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. यासाठी माणुसकीच्या भावनेतून शहरातील अनेक संघटना, संस्था, राजकीय कार्यकर्ते पुढे येऊन गरजू नागरिकांना मदत करीत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इंद्रायणी प्रभागाच्या नगरसेविका नम्रता योगेश लोंढे आणि युवा कार्यकर्ते योगेश लोंढे या दांम्पत्याने भोसरीतील बालाजीनगर, खंडेवस्ती, गवळीमाथा, गणेशनगर या भागामध्ये प्रत्येक कुटुंबांला दोन किलो तांदूळ, व एकूण दहा टन भाजीपाल्याचे वाटप केले आहे. तसेच या परिसरात कर्तव्य बजावत असणा-या पोलिस, सफाई कर्मचारी यांना सॅनिटायझर, पाण्याची बॉटल व मोफत जेवण वाटप केले आहे. मागील आठवड्यात आवश्यक त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने औषध फवारणी करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभागामध्ये ज्या ठिकाणी खुली मंडई सुरु करण्यात आली आहे त्या ठिकाणी नागरिकांनी दिलेल्या वेळेत सुरक्षितरीत्या सामाजिक अंतर पाळून, तोंडाला मास्क लावून भाजी खरेदी करावी, अनावश्यक कारणासाठी नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये. पोलिस, प्रशासन व आरोग्य कर्मचा-यांना सहकार्य करावे. घरात बसूनच आपण कोविड 19 चा सामना करू शकतो. कोणत्याही व्यक्तीस ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असल्यास जवळच्या महानगरपालिका रुग्णालयात तपासणीसाठी जावे असे आवाहन नगरसेविका नम्रता योगेश लोंढे यांनी केले आहे.