ताजा खबरे

संवाद नागरिकांशी, लढा कोरोनाशी !

पिंपरी, दिनांक २७ एप्रिल २०२०- कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलेल्या उपाय योजना व नागरिकांनी घ्यावयाची दक्षता याबाबत माहिती देण्यासाठी २८ एप्रिल २०२० पासून पाच दिवस कोरोना सोबत जगताना या उपक्रमाअंतर्गत नागरिकांबरोबर फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधण्यात येणार आहे. त्याअंतर्गत मंगळवार दि. २८ एप्रिल रोजी सकाळी १०:३० वाजता फेसबुक लाईव्हद्वारे महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह पदाधिकारी व वैद्यकिय क्षेत्रातील तज्ञ या फेसबुक लाईव्ह सिरीजमध्ये सहभागी होतील.

३० एप्रिल रोजी सकाळी १०:३० वाजता कोरोना सोबत जगताना या संवादपर उपक्रमाअंतर्गत शहरातील जेष्ठ नागरिकांशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधतील. त्यांच्या समवेत नामवंत वैद्यकीय तज्ञ हेही सहभागी होणार आहेत. १ मे रोजी उद्योजकांसमवेत फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधतील, २ मे रोजी कोरोना समवेत जगताना महिलांचे आरोग्य याविषयावर फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधतील आणि ४ मे रोजी युवकांसमवेत संवाद साधण्यात येवून जनजागृती करण्यात येणार आहे.