YCM.HOSPITAL पूर्णपणे कोविड19 या संसर्गजन्य आजाराचे संशयित व बाधित रुग्णांना समर्पित

PIMPRI:- ( VASTAV CHAKRA NEWS ) पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आवाहन यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पूर्णपणे कोविड19 या संसर्गजन्य आजाराचे संशयित व बाधित रुग्णांना समर्पित आहे. रुग्णालयात फिव्हर क्लिनिक व नातेवाईका करिता समुपदेशन केंद्र सुरू केले आहे. कोरोना बाधित रुग्णाचे संपूर्ण उपचार हे मोफत करण्यात येत असून आवश्यक चाचण्या व उपचार शुल्क रुग्णांचे नातेवाईकां कडून कोणत्याही स्वरूपात आकारले जात नाही या शिवाय उपचार कालावधी दरम्यान रुग्णाला नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण मोफत पुरविण्यात येत आहे.कोवीड व्यतिरिक्त अन्य आजार असल्यास सदर व्यक्ती अथवा नातेवाईक यांनी आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी, य च स्मृती रुग्णालय , पिंपरी यांचे कडून संदर्भ सेवा पत्र घेऊन पद्मश्री डी वाय पाटील रुग्णालय , पिंपरी येथे वैद्यकीय सेवा मिळवता येईल. रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी उपचारासाठी येताना आधार कार्ड व रहिवासी असल्याचा पुरावा हा मोबाइल मध्ये फोटो काडून दाखल होताना नोंदणी कक्षात समयी सादर केल्यास नोंदणी प्रक्रिया सुलभ होईल तसेच पूर्वीचे काही गंभीर आजार असल्यास त्या बाबतची कागदपत्रे व औषधे सोबत ठेवावी यामुळे रुग्णाचे उपचार योग्य दिशेने करणे सुलभ होणार आहेकोवीड व्यतिरिक्त अन्य आजार असल्यास सदर व्यक्ती अथवा नातेवाईक यांनी आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी, य च स्मृती रुग्णालय , पिंपरी यांचे कडून संदर्भ सेवा पत्र घेऊन पद्मश्री डी वाय पाटील रुग्णालय , पिंपरी येथे वैद्यकीय सेवा मिळवता येईल.
सदर रुग्णांना शासनाच्या विविध योजना उदा महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचा लाभ घेण्यासाठी त्यांनी आपले पिवळे, केशरी शिधा पत्रिका, आधार कार्ड, इत्यादी ओळख पत्र आणावे जेणे करून त्यांना इतर रुग्णालयात सुविधांचा लाभ घेता येईल. असे आवाहन वाय .सी. एम पी. जी .आय .चे अधिष्टता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी केले आहे