मानवहित लोकशाही पार्टीचे अध्यक्ष मा. सचिनभाऊ साठे यांना विधानपरिषदेवर घेऊन मंत्री करा

साहित्यसम्राट आण्णाभाऊंचे नातू तथा मानवहित लोकशाही पार्टीचे अध्यक्ष मा. सचिनभाऊ साठे यांना विधानपरिषदेवर घेऊन मंत्री करावे:

महाराष्ट्र; सध्या विधानपरिषदेच्या नऊ जागांकरिता निवडणुक होणार असुन, महाआघाडीच्या वतीने साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे यांचे नातू व मानवहित लोकशाही पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.सचिनभाऊ साठे यांना विधानपरिषदेवर घ्यावे व मंत्री करावे, अशी मागणी मानवहित लोकशाही पार्टीच्या ….. जिल्हा समितीच्यावतीने करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी विनंती केल्यामुळे मा.सचिनभाऊ साठे यांनी २०१९ विधानसभा निवडणुकीमध्ये मित्रपक्ष म्हणुन महाआघाडीचा संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार केला. ज्यावेळी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला त्यांचे दिग्गज नेते सोडुन गेले होते व या आघाडीची परिस्थिती नाजुक झाली होती तेंव्हा मा. सचिनभाऊ साठे यांनी वेळ-काळ न पाहता या आघाडीचा जोमदारपणे महाराष्ट्रात प्रचार केला व अनेक आमदार निवडुण आणण्यात आघाडीला मदत केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. शरद पवार साहेबांनीही त्यांना विधानपरिषद देण्याचा शब्द दिला असुन तो शब्द पूर्ण करण्याची वेळ आता आली आहे.
मा. सचिनभाऊंना विधानपरिषदेवर घेवुन मंत्रीमंडळात स्थान द्यावे हि महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांची अपेक्षा असुन महाआघाडीने मा. सचिनभाऊंना उमेदवारी देऊन निवडुन आणावे व त्वरित मंत्रीमंडळात स्थान द्यावे, अशी मागणी मानवहित लोकशाही पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष …. , जिल्हा उपाध्यक्ष , जिल्हा सचिव , व पक्षाचे कार्यकर्ते यांनी केली आहे.

मानवहीत लोकशाही पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्ष मा.राजू शिवाजी धुरंधरे नेते