महापौरांचे नातुवांचे सामाजिक भान, वाढदिवसाच्या खर्च टाळून COVID-19 साठी मद्द

सं.दिपक श्रीवास्तव 9373118087/9067865094 पिंपरी, (दि.१३ मे २०२०) – पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संसर्ग लक्षात घेऊन सामाजिक दातृत्वाच्या भावनेने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे नातू कु.ज्ञानेश जवाहर ढोरे याने स्वतःच्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळून कोरोना (कोविड- १९) रुग्णांवरचे उपचार, त्यासाठीची औषधं आणि इतर सामुग्री अशा सगळ्याच गोष्टींसाठी

महापालिकेस रक्कम रु.५१,०००/- इतक्या आर्थिक देणगीच्या रुपाने मदत दिलेली आहे.

घरातूनच समाजकारणाचे बाळकडू मिळालेल्या कु.ज्ञानेश याने सामाजिक गरज ओळखून कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करत कुटुंबाचा वारसा पुढेही चालविला आहे. कु. ज्ञानेश याचा १३ वा वाढदिवस होता त्याने स्वतःच्या वाढदिवशी होणारा अनावश्यक खर्च टाळून कुटुंबियांसमवेत अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा केला.

सध्या देश आणि जगासमोरचं कोरोना व्हायरसचे संकट हे मानवते समोरचे सर्वांत मोठे आव्हान आहे. त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे ही काळाची गरज लक्षात घेता महापालिकेस देण्यात आलेली आर्थिक मदत प्रशंसनीय असून समाजातील इतरांसमोर आदर्श निर्माण करणारी आहे.