कॅप जेमीनी कंपनीकडुन महानगरपालिकेस १००० पीपीई किट सुपुर्द

कॅप जेमीनी कंपनीकडुन महानगरपालिकेस १००० पीपीई किट सुपुर्द
सं. दीपक श्रीवास्तव 9373118087/9067865094

पिंपरी, दि.१३ मे २०२० :- कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कॅप जेमीनी टेक्नॉलॉजिक लिमिटेड कंपनीकडुन सीएसआर माध्यमातुन महानगरपालिकेस १००० पीपीई किट वाटप करण्यात आले आहे. कंपनीचे केंद्र प्रमुख मनीष मेहता यांनी महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचेकडे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाय.सी.एम. रुग्णालयाकरीता वाटपासाठी सदर किट सुपुर्द केले.

यावेळी अतिरीक्त आयुक्त संतोष पाटिल, अजित पवार, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर कंपनीचे प्रतिनिधी विनय शेट्टी, हरीष उमाप, भिमराव कांबळे उपस्थित होते.