मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज सार्वजनिक ठिकाणी, ईदगाह किंवा मस्जिद मध्ये न जाता आपल्या घरातच अदा करावी. – हमीद शेख

सं. दीपक श्रीवास्तव-9373118087/9067865094
PIMPRI: ( VASTAVCHAKRA NEWS )गेल्या १४४० वर्षात असे कधी झाले नव्हते की ईदची नमाज ईदगाह किंवा मस्जिद मध्ये अदा केली नाही. या वर्षी २५ तारखेला ईदची नमाज मुस्लिम बांधवांना घरीच अदा करावी असा निर्णय पिंपरी चिंचवड शहर सह सर्व देशभरात घेण्यात आला आहे.
या निर्णया नुसार ईदुल फित्र ची नमाज घरीच अदा करून ही रमजान ईद समाजातील गरजू लोकांना मदत करून साजरी करावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर अल्पसंख्याक सेलचे सरचिटणीस हमीद शेख यांनी सर्व मुस्लिम बांधवांना केले आहे.
करोना वायरसचे संसर्ग रोखण्यासाठी सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने आपापल्या घरातच नमाज अदा करणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. त्यामुळे करोना विरुध्दचा हा लढा मानवता आणि विज्ञानवादाच्या दृष्टी कोनातुन तुम्हा आम्हाला जिंकता येणार आहे.
संपूर्ण जगाच्या कल्याणाची कामना करणार्या भारतात आज शांतता, सद्भावना अधिक दृढ करण्याची अवश्यकता असून करोना वायरसचे प्रादुर्भाव लवकर कमी होण्यासाठी आपण आपल्या पद्धतीने प्रशासनाला सहकार्य करावे असे ही अवाहन हमीद शेख यांनी केले.