भाडेकरुला न काढता त्यांना सहकार्य करावे- महापौर उषा उर्फ माई ढोरे

पिंपरी – , दि.१७ जून, २०२० – पिंपरी चिंचवड ही औद्योगिक तसेच कामगार नगरी

असून अनेक गोरगरीब कामगार हे पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत. लॉकडाऊनच्या

काळात सर्वत्र संचारबंदी, जमावबंदी जाहीर करुन उद्योगधंदे, व्यवसाय बंद करण्यात आलेले होते.

त्यामुळे ब-याच गोरगरीब, कष्टकरी, कामगार, खाजगीं नोक्रदार खाजगी व्यावसायिक, रोजंदारीवर काम करणारे मजूर लोकांना रोजगार नसल्याने जीवन जगण्याची भ्रांत पडलेली

होती. तसेच लॉकडाऊनचा लोकांच्या उत्पन्नावर आणि रोजगारावर विपरीत परिणाम झाला आहे.

“अनेक लोक या कठीण आर्थिक परिस्थितीचा सामना आजही करत आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील अनेक लोक त्यांचे नियमित घरभाडे भरण्यास सक्षम नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र गृहनिर्माण विभागाने यापूर्वीच परिपत्रक काढले आहे. तसेच कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग व प्रादुर्भाव लक्षात घेऊन आजारास अटकाव करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सलून व्यवसायिकांना ३० जून पर्यंत व्यवसाय सुरु करण्याची परवानगी दिलेली नाही.

त्यामुळे त्यांना सध्या रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. अशा कठीण आर्थिक परिस्थितीमध्ये घरमालकांनी लॉकडाऊनच्या तीन महिन्यांच्या काळातील घरभाडे

भाडेकर कडून सक्तीने वसुल न करता टप्प्याटप्याने वसूलीबाबत सवलत द्यावी तसेच भाडेकरार संपुष्टात आल्याने घरमालकाने कोणत्याही भाडेकरुला न काढता, त्यांना सहकार्य करावे, असे नम्र आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले आहे.

VASTAV CHAKRA NEWS संपादक – दीपक श्रीवास्तव

संपर्क- 9373118087/WHAT’S APP-9067865094