पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टीत समाजकार्य केलेल्या व्यक्तींचा यूवक कॉंग्रेस तर्फे ‘कोरोना योध्दा’ पुरस्कार देऊन सन्मान

पिंपरी – ( वास्तव चक्र ) पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने दि. १९ जून ते २५ जून या दरम्यान सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत कोरोना या आजारा विरोधात उत्तम कार्य केलेल्यांचा ‘कोरोना योध्दा’ या नावाने पुरस्कार प्रमाणपत्राद्वारे सत्कार करण्यात आला आहे. तसेच गरजुंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, विद्यार्थ्यानां वह्या -पुस्तके वाटप व वृक्षलागवड देखील करण्यात आले आहे.

या सप्ताहा अंतर्गत आज सांगवी येथे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, चिंचवड येथील तालेरा रूग्णालयात डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी , सुरक्षा कर्मचारी व सफाई कामगारांना सन्मान प्रमाणपत्र देऊन आभार व्यक्त करण्यात आले तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टीतीत उल्लेखनीय काम केलेले सामाजिक कार्यकर्ते व आशा वर्कस् यांना सन्मान पत्रे देऊन आभार व्यक्त करण्यात आले.

यामध्ये आशा वर्कर्स वंदना गायकवाड,दिक्षाजोगदंड
अरूणा जोगदंड, अश्विनी पवळ,प्रतिभा बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते मनोज गजभार, सिध्दार्थ सिरसाठ, चंद्रकांत बोचकूरे,राजेंद्र साळवे,सतीश भांडेकर, अजय शेरखाने, मिलिंद शिंदे, विशाल पवळ विष्णू सरपते, प्रवीण कांबळे आणि पञकार दिपक साबळे यांना कोरोना योध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कांग्रेस चे नेते व खासदार राहूलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त या सेवा सप्ताहाचे आयोजन करून सेवाकार्य रुपी उपक्रमाद्वारे युवक काँग्रेस कडून वाढदिवस साजरा करण्यात येत आहे, ‘काँग्रेस का हात आम आगामी के साथ’ हा संदेश वाढदिवसा निमित्त देण्यात यावा तसेच कोरोना योध्दा सन्मानाने सामाजिक बांधिलकीची जाणीव वृध्दीगंत व्हावी या उद्देशाने सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे”
असे युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी जिल्हा सरचिटणीस युनूस बागवान, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष नासीर चौधरी, मयुर तिखे,सार्थक रानवडे, रफिक खान, तौसिफ खान, अल्ताफ शेख व राजेश जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले.

संपादक- दीपक श्रीवास्तव – वास्तव चक्र

बातमी व जाहिराती साठी संपर्क – 9373118087 / 9067865094