फलटण- येथे तबलीग जमात यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

फलटण :- आज दी. ०४/०७/२०२० रोजी फलटण येथे तबलीग जमात यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते
सदरचा कार्यक्रम सातारा जिल्हा ताबलिग जमात यांच्या निर्देशानुसार आणि फलटण तालुका तब्लिग जमात यांच्या नियोजनानुसार आणि तब्लिग जमातचे जिल्हा अध्यक्ष आमिर साहेब जनाब अनीसभाई तांबोळी यांच्या उपस्थितीत सुरळीत पार पडला
या कार्यक्रमास म्हाडा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच सातारा जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर यांनीही भेट दिली
सदर रक्तसाठा हा अक्षय ब्लड बँक आणि बालाजी ब्लड बँक यांच्या अनुभवी टीमने एकत्रित संकलन केला या कार्यक्रमातून एकूण ३२४ रक्त पिशव्यांचे संकलन झाले
सदर कार्यक्रमात मुस्लिम समाजाबरोबर ईतर समाजाच्या व्यक्तींनी आपले रक्तदान केले हे उल्लेखनीय आहे यातून हिंदू मुस्लिम ऐक्याचे उदाहरण पुन्हा एकदा दिसून आले
सदर कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी मुस्लिम समाजाचे सर्व पक्षीय मान्यवर व्यक्ती, तरुण वर्ग तसेच पत्रकारही उपस्थित होते.

संपादक- दिपक श्रीवास्तव , 9373118087 WHAT’S aap- no- 9067865094

बातमी व जाहिराती साठी संपर्क साधावा VASTAVCHAKRA NEWS