गांधीनगर भागातील समाजसेवकांनी शहरात ठेवला आदर्श ;कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांसाठी समाजसेवक सरसावले

पिंपरी : (वास्तव चक्र ) पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. रविवार (दि.5) रोजी एकाच दिवसांत 321 नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची भर पडली.तर 4288 एकूण रुग्णांचा आकडा पार झाला आहे . यामुळे आता पर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 हजार 288 वर जाऊन पोहचली आहे. शहराची कोरोनाची चिंता वाढल्याने रूग्ण दवाखान्यात कोरोना चाचणी करण्यास येत नव्हते. अशातच पिंपरीतील गांधीनगर, खराळवाडी, कामगारनगर आणि बजरंग नगर या परिसरातील नागरिकांना मोफत कोरोना स्वँपची तपासणी शिबीर येथील समाजसेवकांनी दि. 3 जुलै रोजी आयोजित केले होते..

याकामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर उषा उर्फ माई ढोरे, अतिरिक्त आयुक्त – आण्णा बोदडे, आरोग्य अधिकारी डॉ. पवन साळवे, आरोग्य अधिकारी डाॅ – वर्षा डांगे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. तृप्ती सांगळे आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील स्टाफ तसेच प्रेस संपादक आणि पञकार सेवा संघाच्या महिला अध्यक्षा सौ. मंदा बनसोडे आणि पञकार सेवा संघाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष श्री. दिपक साबळे यांच्या पाठवुराव्याने हे काम झाले.

त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात रिकॉर्ड ब्रेक 300 पेक्षा जास्त लोकांचे मोफत स्वैब टेस्ट, रक्त तपासणी आणि हाय लो बीपी टेस्ट घेण्यात आली. मात्र हे करूनच सामाजिक कार्यकर्ते थांबले नाही तर या तपासणी केलेल्या 300 पैकी ज्यांचा कोरोना पाॅझिटिव्ह रिपोर्ट आला त्यांच्या घरी जाऊन तेथील परिसरात सेनिटायसर फवारणी केली. तसेच रूग्णांना दवाखान्यात दाखल करण्याची जवाबदारी समाजसेवक धनराजसिंग चौधरी, पञकार – दिपक साबळे, सतिश भांडेकर, दिपक म्हेञे,सचिन गुंजाळ, राजन गुंजाळ,चंद्रकांत बोचकूरे, सिध्दार्थ शिरसाठ, विशाल पवळ, राजेंद्र साळवे, मनोज गजभार, अजय शेरखाने,आकेश वाव्हळ, विशाल कोळी, अमोल बेंद्रे,प्रतिभा बनसोडे, मनिषा केदारी यांनी पार पाडली.

यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका दवाखान्यातील डॉ – मशनुन नजीर , नर्स- रेश्मा मधूकर सोनवणे,नर्स- उर्मिला दशरथ मैंनदंड,स्वयंसेविका-अश्विनी पवळ, होमगार्ड अक्षय राक्षे यांनी त्यांना सहकार्य केले.

पिंपरी चिंचवड महापालिका आणि ग्रामीण भागात देखील कोरोना बाधित रूग्णांच्या वाढीचा वेग कायम आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना रूग्ण संख्या मात्र कमी होताना दिसत नाही.त्यामुळे सर्व नागरिकांनी मास्क घालावा असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केले आहे.
बातमी साठी संपर्क साधावा 9373118087/9067865094

संपादक-दिपक श्रीवास्तव – VASTAVCHAKRA