कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात १४ दिवसांकरिता कडक लॉकडाऊन करा

मा. उद्धवजी ठाकरे साहेब 
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य 
मा. श्रवण हर्डीकरसाहेब 
आयुक्त पि. चिं. मनपा. 
  
PIMPRI: ( VASTAV CHAKRA ) पिंपरी चिंचवड शहरात कोरोना या आजाराचे रुग्ण वाढण्याचा वेग दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. ही चिंताजनक बाब आहे. आजपर्यंत शहरातील कोरोना बाधितांचा आकडा तीन  हजारांच्या वर आहे. मागील काही दिवसांपासून एका दिवसाला दीडशे ते दोनशे, तीनशेहून नवीन रुग्ण सापडत आहेत. महापालिका व खासगी रुग्णालयात कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवर देखील उपचाराबाबत रुग्णांना, नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरामध्ये रुग्णालयात बेडची संख्या अपुरी पडत आहे. शहरात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. आता ख-या अर्थाने कोरोनाची साखळी तोडण्याची आवश्यकता आहे. 
वाढती रुग्णसंख्या पाहता नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल महापालिकांनी लॉकडाऊन केला आहे. आपल्या शहरातही रुग्णसंख्या वाढीचा वेग मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी  कठोर पाऊले उचलणे अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात झोपडपट्टी भागात सर्व सुविधा पुरवून, झोपडपट्टी धारकांना एक महिन्याचे राशन किट देऊन  १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन  करा – सुुुुरेश शांताराम निकाळजे 
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )
अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा 

संपादक -दीपक श्रीवास्तव

बातमी व जाहिराती साठी संपर्क साधा- 9373118087/9067865094