व्यावसायिक,दुकानदार यांनी दिव्यांग बांधवांना पहीले प्राधान्य द्यावे; महानगरपालिकेचा आदेश

पिंपरी: VASTAVCHAKRA दिनांक २२/०७/२०२०
सध्या कोरोनाच्या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिक भाजीपाला, किराणा, मटण-चिकन खरेदी करण्यासाठी दुकानांच्या बाहेर रांगा लावत आहेत. दिव्यांग व्यक्तींनाही याच रांगांमध्ये प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र या रांगांमध्ये दिव्यांग बांधवांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जात नसल्याची बाब समोर आली आहे. लॉकडाऊन मुळे दिव्यांग व्यक्तींना भाजीपाला खरेदी, पेट्रोल भरणे, दवाखाना, मेडिकलमध्ये आदी विविध कामांसाठी घरा बाहेर पडावे लागत आहे .मात्र विशेष स्वतंत्र रांगां नसल्यामुळे दिव्यांगांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. बऱ्याच दिव्यांग बांधवांकडे दुचाकी नाहीत, काहींना भाड्याने रिक्षा करणे परवडत नाही, बरेच जण कुबड्यांचाच वापर करतात त्यात बस सेवा देखील बंद आहे. काही दिव्यांग बांधव कुबड्या अथवा काठ्यांच्या साहाय्याने रांगेत उभे असूनही काही सुद्रुढ नागरिक त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची परिस्थिती काही ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांना भाजीपाला,किराणा दुकानाच्या ठिकाणी व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी अडचण होणार नाही अशा रीतीने शहरातील प्रत्येक नागरिकांनी दिव्यांग बांधवांना मानवतेच्या उदात्त हेतूने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच व्यावसायिक / दुकानदार यांनी दिव्यांग बांधवांसाठी प्रथम प्राधान्याने सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा .
अशा सुचना समाज विकास अधिकारी संभाजी भगवान ऐवले यांनी दिल्या आहेत.

बातमी व जाहिराती साठी संपर्क साधावा
9373118087 WHAT’S aap- 9067865094
किंवा
बातमी ई मेल करा deepakshrivastav.drs@gmail.com
संपादक- दीपक श्रीवास्तव