कोरोना विषाणू (कोव्हीड -१९ ) संसर्गांने मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मृतदेहाचे मुख दर्शन मिळालाच पाहिजे; विरोधी पक्षनेते नाना काट

VASTAVCHAKRA NEWS संपादक दीपक श्रीवास्तव

 पिंपरी:(वास्तव चक्र न्यूज़) पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना संसर्गांचा प्रादुर्भाव दिवसोदिवस वाढतच चालला आहे. आज अखेर एकुण १३३८२ कोरोना बाधित नागरीक असून त्यापैकी ४८२५ रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णांवर उपचार चालू असून आतापर्यंत २५२ नागरीकांच्या कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच    रोज चारशे- पाचशेच्या पटीत कोरोनाबाधित सापडत आहेत. त्यामुळे शहरात कोरोनाग्रस्तांची स्थिती गंभीर झालेली आहे. जुलै – ऑगस्ट मध्ये सुध्दा कोरोना बाधित रुग्णांची संख्या  वाढून १५ ते २५ हजार होईल असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे.  कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे कोरोना मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा देह प्लॉस्टिक वेष्टणा मध्ये बंद करुन तो नातेवाईकांकडे न देता नातेवाईकांच्या उपस्थित त्याच्यावर मनपा मार्फतच अत्यंसस्कांर केले जातात. यामध्ये कोरोनाबाधितांच्या मृत्यदेहाचा चेहरा सुध्दा त्यांच्या नातेवाईकांना पाहता येत नाही. त्यामुळे  नातेवाईक भावनिकदृष्टया खचून जातात कोरोनाबाधित मृतदेहाचा कमीत कमी चेहरा तरी पाहिला जावा अशी नातेवाईकांची अपेक्षा असते. मात्र संसर्गांच्या भितीमुळे संपूर्ण मृतदेह प्लॉस्टिक वेष्टणामध्ये बंद केल्यामुळे मृतदेहाचा चेहरा दाखविणे शक्य होत नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होणार नाही व कोरोनाबाधित मृतदेहाचा चेहराही नातेवाईकांना पाहता येईल अशा प्रकाराचे प्लॉस्टीक वेष्टण उपलब्ध करता येईल का ? याबाबत चाचपणी करण्यात यावी.

       कोरोनाबाधित मृतदेहाचा चेहराचा भाग जर प्लॉस्टीक  वेष्टणाचा चेहराचा भाग  पारदर्शी केल्यास जवळच्या नातेवाईकांना  मृतदेहाचा चेहरा पाहता येईल, व भावनिकदृष्टया त्यांचे समाधान होईल.  तरी आपणांस विनंती आहे की, कोरोनाबाधित मृतदेहाचा चेहरा दिसेल अशा पध्दतीचे प्लॉस्टिक वेष्टण वापरण्यात यावे. त्यामुळे जवळच्या नातेवाईकांना सुरक्षित अंतरावरुन ( फिजीकल डिस्टंन्स पाळून) का होईना त्या रुग्णाचे अंतिम दर्शन घेता येईल.

बातमी व जाहिराती साठी संपर्क साधावा
9373118087 WHAT’S aap- 9067865094
किंवा
बातमी ई मेल करा deepakshrivastav.drs@gmail.com
संपादक- दीपक श्रीवास्तव