कोरोनाने मृत्यूंची संख्या वाढतेय, पिंपरी-चिंचवड महापालिकेने १०० व्हेंटिलेटर बेड्स त्वरित खरेदी करावेत; R.P.I शहराध्यक्ष सुरेश निकाळजे

VASTAVCHAKRA NEWS


पिंपरी, दि. 24 (वास्तव चक्र न्यूज़ ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेने १०० व्हेंटिलेटर बेड्स त्वरित खरेदी करावेत. तसेच महापालिकेच्या ऑनलाइन डॅशबोर्डवर खाजगी रुग्णालयांप्रमाणे शहरातील सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेड्सचीही माहिती देण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी केली आहे.

यासंदर्भात सुरेश निकाळजे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “शहरातील कोरोना रुग्ण संख्येने १३ हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे शहरातील परिस्थिती खूपच भयंकर होत चालली आहे. महापालिकेच्या अंर्तगत येत असलेल्या रुग्णालयात व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे मागील काही दिवसात वायसीएम रुग्णालयात कोरोना रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा करावी. तसेच महापालिका रुग्णालयांसाठी १०० व्हेंटिलेटर बेड्स त्वरित खरेदी करण्यात यावेत. त्याचप्रमाणे शहरातील सरकारी रुग्णालयांतील उपलब्ध बेड्सबाबत महापालिकेच्या ऑनलाइन डॅशबोर्डवर माहिती उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.”


बातमी व जाहिराती साठी संपर्क साधावा
9373118087 WHAT’S aap- 9067865094
किंवा
बातमी ई मेल करा deepakshrivastav.drs@gmail.com
संपादक- दीपक श्रीवास्तव