लॉकडाऊन काळात खाजगी व इंग्रजी शाळांकडून होणारी पालकांची लूट थांबवा सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके

VASTAVCHAKRA NEWS

पालकांनी मांडल्या सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या समोर व्यथा

संबंधितांवर कारवाई करण्याच्या आयुक्तांना दिल्या सुचना

पिंपरी चिंचवड : (वास्तव चक्र न्यूज़) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षण संस्थांनी येत्या शैक्षणिक वर्षात शुल्कवाढ करू नये, तसेच शुल्क टप्प्या-टप्प्याने भरण्याचा पर्याय शाळांनी द्यावा, असे स्पष्ट आदेश शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य आणि केंद्रीय मनुष्यबळ विभागाने दिलेले आहेत. तरी देखिल पिंपरी चिंचवड शहरातील काही खाजगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून विविध प्रकारच्या ( टयूशन फी, स्पोर्टस फी, ट्रॅव्हलींग चार्जेस, युनिफॉर्म चार्जेस, स्टेशनरी, बुक्स इ. ) फी वसुल केल्या जात असल्याच्या तक्रारी वाढल्या असून याबाबत महापालिकेने संबंधित शाळांवर योग्य ती कारवाई करावी अशा सुचना सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केल्या आहेत. यावेळी नगरसेविका आरतीताई चोंधे, निर्मलाताई कुटे, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष संकेत चोंधे यांचेसह पालक उपस्थित होते.
लॉकडाऊनच्या कालावधीत उद्योग व्यवसाय बंद असल्याने सर्वच स्तरावरील नागरिकांचे अर्थकारण बिघडले आहे. मात्र, या कठीण परिस्थितीतही शहरातील काही खाजगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून विद्यार्थी पालकांकडे शालेय शुल्काची मागणी होत असल्याच्या तक्रारी वाकड थेरगाव परिसरातील पालकांनी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्याकडे केल्या. त्याबाबत आलेल्या पालकांसह मा. आयुक्त्‍ यांची भेट घेऊन या भागातील खाजगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा शालेय शुल्काच्या मागणीचा तगादा लावत आहेत. लॉकडाऊनमुळे सर्वांचीच आर्थिक परिस्थिती खालावली असताना सुध्दा शालेय व्यवस्थापनांकडून मागिल शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत सुमारे दिडपट शालेय शुल्क वाढविले आहे. सध्या कोरोनाच्या महामारीत राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय झालेला असुन सुध्दा शाळांकडुन न परवडणारी फि बाबत तगादा लावला जात आहे. तसेच या कालावधीमध्ये शाळांकडुन सुरु असलेल्या ऑनलाईन शिक्षणासाठी देखिल टॅब, लॅपटॉप, मोबाईल खरेदीचा खर्च पालकांनाच करावा लागणारा असुन त्यासाठीचा वेळ सुध्दा पालकांनाच द्यावा लागणार आहे. असे असताना शाळांवर कुठल्याही खर्चाचा ताण नसतानाही शालेय शुल्कात भरमसाठ वाढ करणे व त्यासाठी वारंवार पालकांकडे त्याची मागणी करणे हे योग्य नसल्याचे उपस्थित पालकांनी व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी मा. आयुक्तांच्या निदर्शनास आणुन दिले. या संदर्भात आयुक्तांनी लॉकडाऊन सुरू असेपर्यंत शालेय व्यवस्थापनाने शालेय शिक्षण शुल्काची मागणी करू नये, त्याबाबत पालकांकडे वारंवार तगादा लावू नये तसेच शालेय शुल्क टप्प्या टप्प्यात स्विकारणेत यावे, याबाबत संबंधित शालेय प्रशासनाला समज दिली जाईल. यावर नियंत्रण आणण्यासाठी शासनस्तरावर देखिल पत्रव्यवहार करुन याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले.

बातमी व जाहिराती साठी संपर्क साधावा
9373118087 WHAT’S aap- 9067865094
किंवा
बातमी ई मेल करा deepakshrivastav.drs@gmail.com
संपादक- दीपक श्रीवास्तव