शरद पवार यांना भाजपा युवा मोर्चाच्या वतीने लक्षावधी पत्रातून देण्यात येणार “ जय श्रीराम”चा नारा…!

VASTAV CHAKRA NEWS संपादक- दीपक श्रीवास्तव


पिंपरी: ( वास्तव चक्र न्यूज़ )
राम मंदीराविषयी आपली भूमिका व मत मांडल्याबद्दल उपरोधिकपणे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीने त्यांना राज्यभरातून “ जय श्रीराम” असा मजकूर लिहिलेली १० लाख पत्रे पाठविली जाणार आहे.
येत्या दोन दिवसात ही पत्रे पोहचतील आणि सोशल मिडियावरही त्याबाबत रान उठविण्याचे नियोजन भाजयुमोने केले आहे.

अयोध्येतील राममंदिराचे भूमिपूजन ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.त्याबद्दल टिप्पणी करताना शरद पवार यांनी, राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का? असे म्हटले होते .त्याचा निषेध म्हणून राज्यातील भाजपचे 10 लाख कार्यकर्ते पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी पत्रे पाठविणार आहे,अशी माहिती भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली.यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील भाजयुमोची यंत्रणा कार्यरत झाली आहे.मुंबई, ठाणे या परिसरातून काल या उपक्रमाची सुरवात झाली आहे.
त्याच मोहिमेला धरून आज पिंपरी चिंचवड शहर भाजपा युवा मोर्चा यांच्यावतीने आज मोहीम राबविण्यात आली,या वेळी उपस्थित महापौर-:मा.सौ.उषा (माई) ढोरे (पिं. चिं महानगरपालिका)
मा. श्री.जवाहर शेठ ढोरे (सदस्य -भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश)
मा. श्री.संकेत चोंधे- शहराध्यक्ष-भाजपा युवा मोर्चा,पिं.चिं शहर
साई कोंढरे-शहरउपाध्यक्ष-:भाजपा युवा मोर्चा पिं. चिं. शहर
दिनेश यादव (स्वीकृत सदस्य)
अभिजित बागुल,शुभम कांबळे,राजेश राज पुरोहित,सुमित घाटे,प्रकाश चौधरी,उदय गायकवाड, शिवराज लांडगे,अतुल राक्षे,भूषण गायके हे पदाधिकारी उपस्थित होते

बातमी व जाहिराती साठी संपर्क साधावा
9373118087 WHAT’S aap- 9067865094
किंवा
बातमी ई मेल करा deepakshrivastav.drs@gmail.com
संपादक- दीपक श्रीवास्तव