सेवानिवृत्त होणा-या – निवृत्ती घेतलेल्या १७ अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार महापौर उषा उर्फ माई ढोरे

पिंपरी, ३१ जुलै २०२०:- सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आनंददायी व आरोग्यदायी जावो. तसेच सेवानिवृत्त होणा-या अधिकारी,कर्मचारी यांनी कोरोना महामारीच्या काळामध्ये आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवेतून माहे जुलै २०२० अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या १७ अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुस्तक, स्मृतीचिन्ह सुपूर्द करुन करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होते. कै.मधुकर पवळे सभागृह, मुख्य प्रशासकीय इमारत येथे झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्य राजेंद्र गावडे, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, नगरसचिव उल्हास जगताप, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, सरचिटणीस सुप्रिया जाधव, बाळासाहेब कापसे, गणेश भोसले आदी उपस्थित होते.


महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये लेखाधिकारी किसन बिडकर, कार्यव्यवस्थापक नारायण पाटील, उपलेखापाल अनिल बोथरा, मुख्याध्यापक माणिक किरवे, सरला गिरी, मुख्य लिपिक नंदा केंदळे, दिपक कांबळे, उपशिक्षक वसुंधरा भोसेकर, सुरेय्या शेख, वाहनचालक साहेबराव उपर्वट, सिस्टर इनचार्ज सुरेखा भांडवलकर, विजतंत्री अशोक नाईक, निदेशक राजू कांबळे, मजूर पांडुरंग धोत्रे, अशोक वाघेरे तर स्वेच्छानिवृत्त होणा-यांमध्ये सफाई कामगार कल्पना साळुंखे आदींचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

बातमी व जाहिराती साठी संपर्क साधावा
9373118087 WHAT’S aap- 9067865094
किंवा
बातमी ई मेल करा deepakshrivastav.drs@gmail.com
संपादक- दीपक श्रीवास्तव