कोरोना मुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांचे निधन

VASTAVCHAKRA NEWS संपादक- दीपक श्रीवास्तवपिंपरी- राष्ट्रवादी कॉग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांचे आज करोनामुळे निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दत्ताकाका साने यांच्यानंतर धडाडीची तोफ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या जावेद शेख यांच्या मृत्यूमुळे राष्ट्रवादीला पंधरा दिवसांत हा दुसरा मोठा झटका बसला आहे.

जावेद शेख यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात करोनाची लागण झाली होती.

मात्र 21 जुलैपासून त्यांची तब्येत जास्त खालवल्याने त्यांच्या प्लाज्मा थेरपीचाही वापर करण्यात आला होता. मात्र निमोनिया झाल्याने ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. यानंतर त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालया उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. सातत्याने खालावली प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती.

जावेद शेख यांच्या लढवय्या वृत्तीमुळे ते करोनावर मात करतील, असे सांगण्यात येत होते. मात्र, त्यांची करोनाविरोधातील लढाई आज (शुक्रवारी) पाचच्या सुमारास संपुष्टात आली. त्यांना पाच वाजता मृत घोषित करण्यात आले. जावेद शेख यांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

बातमी व जाहिराती साठी संपर्क साधावा
9373118087 WHAT’S aap- 9067865094
किंवा
बातमी ई मेल करा deepakshrivastav.drs@gmail.com
संपादक- दीपक श्रीवास्तव