मराठवाडा युवा मित्र मंडळ पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना श्रद्धांजली

VASTAVCHAKRA NEWS संपादक – दीपक श्रीवास्तव

Pimpri: आज दि. 8 ऑगस्ट रोजी मराठवाड्याचे सुपुत्र व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर उर्फ दादासाहेब यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम मराठवाडा युवा मित्र मंडळ पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने कै. विलासराव देशमुख विद्यामंदिर काळेवाडी येथे घेण्यात आला. या वेळी सूत्र संचलन गोरख पाटील निलंगेकर यांनी केलं. तसेच श्री. उत्तम दंडिमे यांनी साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला व त्यांच्या मराठवाडा मित्र मंडळ संस्थेसाठी केलेल्या मोलाच्या योगदानाची थोडक्यात माहिती दिली. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना पुणे शहरात शिक्षणाची दारे खुली करून देण्यासाठी साहेबानी संस्थेमध्ये हॉस्टेल तसेच इतर शैक्षणिक उपक्रम राबविले. साहेबांच्या जाण्याने मराठवाडा पोरका झाला.

यावेळी सर्वानी एखाद्या वंचित विद्यार्थ्याला पाठबळ देऊन साहेबाना खरी श्रद्दांजली वाहण्याचा निर्धार केला.

यावेळी संस्थेचे प्राचार्य एम जी पाटील सर, मुख्याध्यापिका वाल्हेकर मॅडम, विजयकुमार साळुंखे सर, प्रवीण शेळके सर व संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिक सुभाष मुले, स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, पत्रकार मंगेश सोनटक्के,
बालाजी वाकडे, नेताजी वाघमारे, नवनाथ वाकडे, दत्ता गिरी, अंकुश कोळेकर, प्रदीप दळवी, गणेश आहेर तसेच मराठवाड्यातील पिंपरी चिंचवड भागात स्थानिक नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली.

या कार्यक्रमाचे नियोजन शिवसेना विभागप्रमुख गोरख पाटील निलंगेकर, उपविभागसंघटक रविकिरण घटकार,
शाखाप्रमुख नरसिंग माने यांनी केले.


बातमी व जाहिराती साठी संपर्क साधावा
9373118087 WHAT’S aap- 9067865094
किंवा
बातमी ई मेल करा deepakshrivastav.drs@gmail.com
संपादक- दीपक श्रीवास्तव