ॲड.सुषमा नामदास यांची प्रांत ग्राहक संरक्षण समितीच्या हवेली तालुका कायदेशीर सल्लागार पदी निवड

VASTAVCHAKRA-संपादक-दीपक श्रीवास्तव

प्रांत ग्राहक संरक्षण समितीच्या आढावा बैठकीत ॲड.सुषमा नामदास यांची प्रांत ग्राहक संरक्षण समितीच्या हवेली तालुका कायदेशीर सल्लागार पदी निवड करण्यात आली.

पिंपरी-15 ऑगस्ट 2020 रोजी संध्याकाळी पाच वाजता थेरगाव येथे प्रांत ग्राहक संरक्षण समितीचे पदाधिकारी आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत सध्या संपूर्ण विश्व हे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व स्तरातील प्रगतीच्या दिशेने मंदावलेले आहे त्यातच सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या तक्रारी प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत.सध्या अशिक्षित सोबतच सुशिक्षित सुद्धा ऑनलाईनच्या फसवणूक प्रकारांमध्ये अडकला जात आहे एकदा फसवणूक झालेल्या ग्राहकाला कोणत्याही ठिकाणी न्याय मिळत नाही अशा अनेक तक्रारी प्रांत ग्राहक संरक्षण समितीकडे उपलब्ध झालेल्या आहेत. सर्वसाधारण ग्राहकांना न्याय देण्यासाठी प्रांत ग्राहक संरक्षण समिती सतत प्रयत्नशील असते याच विश्वासाने अनेक तक्रारदारांनी प्रांत ग्राहक संरक्षण समितीकडे तक्रारी नोंदवलेले आहेत तरी वरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन रुपाने या ग्राहकांच्या फसवणुकीला आळा बसवणे कामी विनंती करण्यात येणार आहे
वरील आढावा बैठकीत गोपाल बिरारी राष्ट्रीय महासचिव कोअर कमिटी यांनी फसवणूक झालेल्या तक्रारदारांना न्याय व हक्क कसा मिळवून द्यावा यावर मोलाचे मार्गदर्शन केले.
ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी हवेली तालुका कायदेशीर सल्लागार या पदी सुषमा नामदास तसेच पुणे शहर महिला अध्यक्ष निर्मला कुराडे यांची राष्ट्रीय महासचिव गोपाल बिरारी यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र व ओळखपत्र देऊन सन्मानपूर्वक निवड करण्यात आली
तसेच वरील बैठकीत गोपाल बिरारी राष्ट्रीय महासचिव लक्ष्मण पाटील हवेली तालुका अध्यक्ष पंकजभाऊ पवार पुणे शहराध्यक्ष संतोष चव्हाण सुषमा नामदास निर्मला कुराडे. …… इत्यादी मान्यवर उपस्थित होते
बैठकीच्या सुरुवातीला पुणे शहराध्यक्ष चव्हाण यांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करीत मीटिंगचे आयोजन केले होते. पंकज पवार हवेली तालुका अध्यक्ष यांनी प्रस्तावना केली तसेच पुणे शहर महिला अध्यक्ष निर्मला कुराडे यांनी आभार व्यक्त केले.

बातमी करिता संपर्क साधावा,, सं. दिपक श्रीवास्तव. 9373118087,,,what’s aap- 9067865094
किंवा बातमी ई मेल
Email I’d- deepakshrivastav.drs@gmail.com
अधिक माहितीसाठी लिंक वर क्लिककरा
PLEASE
SUBSCRIBE LIKE SHARE COMMENTS
यूट्यूब channel: vastav chakra