खरा लोकप्रतिनिधी म्हणून बाबा कांबळे यांना विधानपरिषदेची संधी मिळावी : राहुल डंबाळे

VASTAVCHAKRA NEWS संपादक-दीपक श्रीवास्तव


पिंपरी: (वास्तव चक्र न्यूज़) महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी होणाऱ्या निवडीमध्ये राजकीय व्यक्तींचे पुनर्वसन न करता खऱ्या अर्थाने निस्पृह समाजसेवा करणाऱ्या व्यक्तींना लोकप्रतिनिधीत्व ची संधी मिळणे आवश्यक असून कष्टकरी समाजाचे गेल्या अनेक वर्षापासून खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करणारे कष्टकरी पंचायत चे नेते बाबासाहेब कांबळे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्यात यावे अशी मागणी राज्यातील तमाम आंबेडकरी चळवळीच्या वतीने करण्यात येत असून त्याबाबतचा पत्र व्यवहार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब काँग्रेस पक्षाचे नेते माननीय राहुल जी गांधी तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याकडे करण्यात येत आहे.

आज पिपरी येथे कष्टकरी पंचायतीचे नेते माननीय बाबा कांबळे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्यात यावे यासाठी विविध पक्ष संघटनांच्या संयुक्त विद्यमाने जनसमर्थन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर जनसमर्थन मेळाव्यामध्ये संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

यावेळी आपली भूमिका व्यक्त करताना राहुल डोंबाळे यांनी सांगितले की कोरोनाव्हायरस नंतरच्या परिस्थितीनुसार असंघटित क्षेत्रातील कामगार

कष्टकरी लोकांचे जगणे असह्य झाले असून कोट्यावधी जनतेला आपल्या रोजगारापासून वंचित राहावे लागले आहे ही परिस्थिती पुढील अनेक वर्षे राहणारी असल्याने या वचित व उपेक्षित घटकांचा आवाज विधान परिषदेमध्ये असणे अत्यावश्यक झाले आहे 40 टक्क्यांपेक्षा अधिक ची महाराष्ट्रातील लोकसंख्या ही असंघटित क्षेत्रांमध्ये कार्यरत असून त्यांचा प्रतिनिधी बाबा कांबळे यांच्या रुपाने विधिमंडळात असल्यास या समुदायांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न होती त्यामुळेच महाराष्ट्रातील तमाम असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पक्ष संघटनांसोबत ठामपणे उभे राहण्याचा निर्णय आंबेडकरी चळवळीच्या वतीने घेण्यात आलेला आहे.

दरम्यान याप्रसंगी बाबा कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सामान्य जनतेकडून विशेषता स्वतंत्रपणे पक्षसंघटना चालवणाऱ्या नेत्यांकडून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या आमदारकीची मागणी होणे हा असंघटित क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून करत असलेल्या कामाचा माझा गौरव मी समजत आहे. आणि खरोखरच कधी नव्हे इतकी गरज आज असंघटित क्षेत्रातील लोकांच्या लोकप्रतिनिधी त्याची निर्माण झालेली आहे. सध्याचे सरकार हे गोरगरीब जनतेसाठी काही करू इच्छित आहे असे वेळोवेळी जाणवत आहे त्यामुळे सरकारने जर आम्हाला संधी उपलब्ध करून दिली तर आमदारकीच्या बळावर राज्यातल्या असंघटित क्षेत्रातील तसेच कष्टकरी क्षेत्रातील कोट्यावधी जनतेचे प्रश्न संसदीय लोकशाही प्रणाली च्या माध्यमातून सोडवणे शक्य आहे. आणि मिळालेल्या संधीचे मी नक्कीच सोने कैल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद देखील बाबासाहेब कांबळे यांनी यावेळी व्यक्त केला.

बातमी करिता संपर्क साधावा,, सं. दिपक श्रीवास्तव. 9373118087,,,what’s aap- 9067865094
किंवा बातमी ई मेल
Email I’d- deepakshrivastav.drs@gmail.com
अधिक माहितीसाठी लिंक वर क्लिककरा
PLEASE
SUBSCRIBE LIKE SHARE COMMENTS
यूट्यूब channel: vastav chakra