आयुक्तांनी करोड़ों रूपयांचे भ्रष्टाचार करण्यासाठी पवना व इंद्रायणी नदीचे रब्बराप्रमाणे लांबी ताणून का धरले?

VASTAVCHAKRA NEWS

स्व.दत्ता काका साने प्रतिष्ठानच्या वतिने भ्रष्ट प्रकरण उघड….,

पिंपरी : पिं.चिं. मनपाच्या स्मार्ट आयुक्तांना ,
स्मार्ट पिं.चिं.मनपाचे स्मार्ट आयुक्त म्हणजेच स्मार्ट भ्रष्ट अधिकारी, ठेकेदार व नेतेमंडळी हिंतचिंतक आहात अशी शहरवासीयांमध्ये खुलेआम चर्चा असताना शहरात सुरू आहे.
कोणतेही गाव समाविष्ट नसताना अचानकपणे पवना व इंद्रायणी नदीचे प्रत्येकी 5 ते 7 कि.मी. लांबी वाढविले आहे. यामुळे सल्लागाराला 1कोटी 25 लाख रूपयांस मान्यता मिळाली आहे. असे स्थायी समिती मध्ये विषय मांडणे हया एकप्रकारे हास्यापद व करदात्यांच्या
तिजोरीवर नेहमीप्रमाणे कागदोपत्री भ्रष्ट व चुकीचे कारभार करीत करोडो रूपयांचे डल्ला टाकण्याचेच प्रकार व शहरवासीयांना नदीचे लांबी वाढविण्याचे आमिष दाखवुन उल्लु बनविण्यासारखे आहे. आयुक्त आजपर्यंत भ्रष्ट व चुकीच्या कारभार करणा-या
लोकांमागे भक्कमपणे पाठीशी उभे राहिल्यामुळे करदात्यांचे हजारो कोटीचे नुकसान झाले आहे. यास साक्षीदार शहरातील 25 लाख शहर वासीय आहेत.

महाविकास आघाडी सरकार आले,असताना देखील आपली बदली न होणे म्हणजेच, “दाल में
कुछ तो काला है”. अशीच चर्चा रंगली आहे. आपण आजही आपली बदली जवळ आली असताना नदीचे लांबी वाढवुन म्हणजेच जे शक्य नाही ते काम करून मर्जीतील सल्लागारांवर 1 कोटी 25 लाख रूपयांचे उधळपट्टी करीत हितचिंतकांचे भले केल्याबाबत यापुर्वी अनेक चुकीच्या व भ्रष्ट काभाराचे पुराव्यासह तक्रारी करून देखील संबंधित भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारांना अभय दिल्याबद्दल व बोगस एफडीआर ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल केला नाही.

तसेच संबंधित अधिकारी संजय कुलकर्णी यानी चुकिची माहिती दिल्याबद्दल त्यांची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी.अशी मागणी स्व. दत्ता काका साने प्रतिष्ठाण वतीने केला आहे.