पुन्हा एकदा धक्कादायक: आनंद उनवणे यांच्या आईचे भरदिवसा अपहरण;पाच आरोपीविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

VASTAVCHAKRA NEWS

पिंपरी- संपादक-दीपक श्रीवास्तव

पिंपरी ( वास्तव चक्र ) :पिंपरी चिंचवडमधील प्रसिद्ध व्यवसायिक आनंद उनवणे यांचे (3 फेब्रुवारी) रोजी अपहरण करून खून करण्यात आला होता.त्यांचा मृतदेह महाडमध्ये पोलिसांना मिळून आला होता.याबाबत पोलिसांनी मुख्य आरोपीसह सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र आता मयत आनंद उनवणे यांचे आईचे भरदिवसा अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि.1) रोजी सकाळी साडेअकरा वाजता पिंपरीतील मोरवाडी चौकात घडली आहे.

याबाबत उनवणे यांच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आहे.

त्यानुसार मुक्ता आंनद उनवणे नेटके, व्यंकट साहेबराव उनवणे, बाळु नेटके, अपर्णा काळोखे, सुनिता राऊत( सर्व रा. गांधीनगर झोपडपट्टी पिंपरी) या आरोपी विरोधात पोलीसांना गुन्हा दाखल केला आहे.
वर्ना फोर व्हिलर आणि किया (MH 14 1881

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरवाडी चौकातून मयत आनंद उनवणे यांची आई फिर्यादी या चिखलीतील त्यांच्या मुलीला भेटायला जात असताना फिर्यादीची सुन मुक्ता उनवणे / नेटके , आणि त्यांचा मुलगा व्यक्ट साहेबराव उनवणे, मुक्ताचा भाऊ बाळु नेटके, आनंद उनवणे यांच्या ऑफिसमध्ये काम करणारी महिला अपर्णा काळोखे व सुनिता राऊत या सर्व आरोपींनी संगनमत करून आनंद उनवणे यांच्या आई फिर्यादी यांना जबरदस्तीने त्यांच्या चार चाकी गाडीत(गाडी नं – 14, 1818) मध्ये घालुन तुम्हाला चांगले इचेक्शन देतो तसेच तुमच्या सुनेस खुप पैसे मिळणार आहेत तुम्ही चला असे म्हणुन त चारचाकी गाडीत घालुन जबरदस्तीने घेऊन गेले. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.