ताजा खबरे

गणपती मुर्ती विसरजन करताना नदी मध्ये बुडून एकाचा मृत्यू एकाचा शोध सुरू

VASTAVCHAKRA NEWSपिंपरी- वास्तव चक्र न्यूज़-पोलीस ठाणे MIDC भोसरी हद्दीतील..
हवालदार वस्ती आळंदी रोड येथील उत्तरेकडे असलेल्या इंद्रायणी नदीमध्ये माऊली वस्ती ,डुडळगाव येथील ठोंंबरे कुटुंबातील नागरिक १८.०० वा चे दरम्यान गणेश विसर्जन करीता आले असताना त्यांचेमधील १. शिवाजी अर्जुन ठोंबरे वय.३० २.नितीन अर्जुन ठोंंबरे वय.३९ ३. दत्ता आबासाहेब ठोंंबरे वय.२० आणि ४.प्रज्वल रघुनाथ काळे वय.१८ असे पाण्यात मुर्ती विसर्जनसाठी आत पाण्यात मध्यभागी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने क्र. ३ दता ठोंबरे व क्र ४ प्रज्वल काळे हे पाण्यात बुडाले आहेत. .. यातील बुडालेल्या दोघांना पोहता येत नव्हते.. ते मुर्ती विसर्जन केल्यानंतर आत पाण्यात गेले होते… MIDC भोसरी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवानांच्या मार्फतीने शोध घेतला असता प्रज्वल काळे यांचा मृतदेह पाण्यात मिळून आला असून दता ठोबरे यांचा शोध चालू आहे..