भारतातील प्रसिध्द उद्योगपती आणि बजाज समूहाचे अध्यक्ष श्री. राहुल बजाज यांचे शनिवारी निधन

VASTAV CHAKRA NEWS-संपादक दीपक श्रीवास्तव

भारतातील प्रसिध्द  उद्योगपती आणि बजाज समूहाचे अध्यक्ष श्री. राहुल बजाज यांचे शनिवारी निधन झाले. हे वृत्त पिंपरी-चिंचवडकरांसाठी वेदनादायी आहे. भारताच्या उद्योग क्षेत्रातील राहुलजी यांचे योगदान न विसरण्यासारखे आहे.
विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवडला ‘ऑटो हब’बनवण्यात बजाज समुहाचा मोलाचा वाटा आहे. बजाज यांच्या जाण्याने ‘उद्योगनगरी’चे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. शहराची वाटचाल आता स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू आहे. त्याच्या पायाभरणीमध्येच खऱ्या अर्थाने बजाज समुहाचा हातभार आहे. आज शहरातील हजारो कामगारांना रोजगार मिळाले आणि शहराला कामगारनगरी अशी ओळख प्राप्त झाली. त्यामुळे आम्हा पिंपरी-चिंचवडकरांचे वर्तुळ बजाजशिवाय पूर्ण होवू शकत नाही. राहुलजी बजाज यांच्या जाण्याने न भरुन येणारी हानी झाली आहे.
ओम शांती…
उद्योगपती स्व. राहुल बजाज यांना भावपूर्ण श्रद्घांजली.. !

– महेश किसनराव लांडगे,
शहराध्यक्ष व आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.