ज्ञानेश खलाशे यांची बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रास भेट

VASTAV CHAKRA NEWS-संपादक- दीपक श्रीवास्तव

पुणे – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रास , वडगांव बुद्रुक,येथे पंजाब नॅशनल बँक वानवडी ,पुणे शाखेचे मॅनेजर मा.ज्ञानेश खलाशे यांनी सत्यशोधक समाज स्थापना दीन शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिम्मित सदीच्या भेट दि.14.12.2022 रोजी सायंकाळी 6.30 वाजता
दिली. या भेटीत त्यांनी फुले दाम्पत्य यांचे सत्यशोधक कार्याची माहिती घेऊन सत्यशोधक विवाह चळवळ आपण महाराष्ट्र आणि तेलगाना राज्यात नेवून वारसा पुढे चालविला म्हणून अध्यक्ष ढोक यांचे कौतुक करीत आजही समाज कार्य करणारे बांधव पाहून आनंद वाटला असे गौवोद्गार काढले.
सत्यशोधक ढोक यांनी सत्यशोधक विवाह विधीचे कार्य मोफत करून पुणे आणि सातारा (वावरहिरे) येथे सत्यशोधक विवाह करण्यासाठी आधुनिक सुविधा सह मोफत सोय केल्याची सर्वांना माहिती दिली
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक विलास कोलंबेकर, सत्यशोधिका आशा ढोक उपस्थित होते
सुरुवातीला थोर समासुधारक महात्मा फुले यांच्या पुतळ्यास मा.ज्ञानेश खलाशे यांचे शुभहस्ते तर सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास ढोक यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
अध्यक्ष सत्यशोधक
ढोक यांनी मॅनेजर ज्ञानेश खलाशे यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले , मराठी,हिंदी, इंग्रजी आणि जर्मन व दीनांची साउली ,थोर ऐतिहासिक शूर महिला ग्रंथ भेट देऊन सन्मानित केले. विनायक कोळंबेकर यांनी आभार मानले तर क्षितिज ढोक यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.