डॉ.डी.वाय पाटील रात्र महाविद्यालयात जागतिक मराठी राजभाषा दिनाचे आयोजन.

VASTAV CHAKRA NEWSसंपादक-दिपक श्रीवास्तव

पिंपरी: 05/03/2023 डॉ.डी.वाय पाटील कला वाणिज्य रात्र महाविद्यालयात जागतिक मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी.डी. पाटील सर, विश्वस्त डॉ.सोमनाथ पाटील सर आणि कार्यकारी संचालक डॉ.अविनाश ठाकूर सर यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रणजित पाटील सर हे होते कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये डॉ.जीवन शिंदे सरांनी रात्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विद्यापीठ अभ्यासक्रमाबरोबर कौशल्य विकासासाठी महिंद्रा ऑटोमॅटिक कंपनीच्या सी.एस.आर च्या मार्फत घेण्यात येणाऱ्या शॉर्ट टर्म कोर्सबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली तर अध्यक्ष मनोगता मध्ये डॉ.रणजित पाटील सर यांनी रात्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मराठी राजभाषा दिनाचे महत्त्व सांगून महाविद्यालयामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध संधीचा जास्तीत जास्त फायदा घेऊन आपली गुणवत्ता विकसित करावी असे मत व्यक्त केले, या कार्यक्रमाचे आभार मानसशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.पंकज शिंगोटे सर यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. रणजित कदम सर यांनी केले या कार्यक्रमासाठी रात्र महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापकेत्त कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग होता.