ताजा खबरे

कोरोना विषाणू या आजाराचा प्रादुर्भाव रोखणेसाठी क्षेत्रीय स्तरावर फिल्ड सर्व्हिलन्स टिम तयार

VASTAVCHAKRA NEWS

पिंपरी, दि. २२ जुलै २०२० – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोरोना विषाणू या आजाराचा प्रादुर्भाव रोखणेसाठी क्षेत्रीय स्तरावर फिल्ड सर्व्हिलन्स टिम तयार करण्यात आल्या असून त्यांना शहरात सर्वत्र फिरणेकामी आवश्यक असलेली २८ वाहने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शासकीय दराने ६ महिन्यांसाठी भाडेतत्वावर घेणेबाबत येणाऱ्या र.रु. १ कोटी २२ लाख खर्चासह एकूण र.रु.१३ कोटी लाख ५० रुपयांच्या खर्चास आज स्थायी समितीच्या व्हीडिओ कोन्फरन्सिंग बैठकीत

मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणेसाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करणेबाबत अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या जलनिःसारण विभागाकडील सन २०१९-२० मधील व त्यापूर्वीच्या चालू असलेल्या ९९ विकास कामांची बिले ३१ मार्च २०२० पर्यंत अदा करणे शक्य झाले नाही. आज झालेल्या बैठकीत त्या ९९ कामांच्या बिलांच्या खर्चासाठी अदा करावयाच्या र.रु.१२ कोटी ६९ लाख रुपयांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली.

महानगरपालिकेच्या सारथी प्रणालीसोबत शहरातील नागरिकांना विशेषत: वृद्ध व लहान मुले यांना प्रत्यक्ष दवाखान्यात न जाता त्यांना आजाराबाबत दूरध्वनी/ मोबाइलद्वारे औषधोपचार उपलब्ध करून देणेकामी Virtual OPD For PCMC Citizen या नवीन प्रणालीकरिता ३ महिन्यांसाठी येणाऱ्या र.रु. २९ लाख ५० हजार रुपयांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली.
बातमी व जाहिराती साठी संपर्क साधावा
9373118087 WHAT’S aap- 9067865094
किंवा
बातमी ई मेल करा deepakshrivastav.drs@gmail.com
संपादक- दीपक श्रीवास्तव